महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातच आरोग्य सेवेचे तीनतेरा; 60 जणांना अतिसाराची लागण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामविकास परिवर्तन योजने अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या मेळघाटातील धारणी तालुक्याच्या दहेंडा गावात ६० नागरिकांना विहरीतील दूषित पाण्यामुळे अतिसारची लागण झाली आहे.

आदीवासी समाज भवन, दहेंडा

By

Published : Jul 10, 2019, 3:56 PM IST

अमरावती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामविकास परिवर्तन योजने अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी मेळघाटातील धारणी तालुक्याच्या दहेंडा गाव दत्तक घेतले आहे. याच गावातील तब्बल ६० नागरिकांना विहिरीतील दूषित पाण्यामुळे अतिसारची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. अतिसारची लागण झालेल्या रुग्णांसाठी समाज मंदिरात आरोग्य छावणी उभारण्यात आली आहे .

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक दहेंडा गावात अतिसाराची लागण

गावातील आरोग्य उपकेंद्रा जवळ विहिरीचे पाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला दूषित झाले होते. अशातच शनिवारी सात ते आठ नागरिकांना शौच व उलटीचा त्रास झाला. त्याचा संसर्ग आतापर्यंत जवळपास साठ गावकऱ्यांना झाला असून त्यांनाही अतिसारची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

ज्या विहरीतील पाण्याने ही लागण झाली त्या विहरीत बिचिंग पावडर टाकायची मागणी गावकऱ्यांनी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेल्या गावातच आरोग्य सेवेचे तीनतेरा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details