महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवसा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर - तिवसा नगरपंचायत न्यूज

तिवसा नगरपंचायत होण्याअगोदर ग्रामपंचायत होती. त्यावेळी येथे शिवसेना सत्तेत होती. आठ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार झाली मात्र, ही पाणी पुरवठा योजना अर्धवटच राहिली.

जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर
जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर

By

Published : Dec 1, 2019, 8:48 PM IST

अमरावती - तिवसा नगर पंचायत नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहते. काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या या नगर पंचायतीत स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरोग्य सभापतींनी केला होता. हा वाद ताजा असतानाच आरोग्य सभापती नरेंद्र विघ्ने यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राची पाहणी केली. पिण्याच्या पाण्यात जलशुद्धीकरण यंत्रावर सहा इंच शेवाळाचा थर आढळला.

जलशुद्धीकरण यंत्रावर आढळला सहा इंच शेवाळाचा थर


नरेंद्र विघ्ने यांनी जलशुद्धीकरण केंद्राचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. नगरपंचायतीचा भोंगळ कारभार समोर येताच नगरपंचायतीने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढून टाकी स्वच्छ केली. या टाकीत ट्रॅकरभर गाळ निघाला.

हेही वाचा - '...आता विधानसभाध्यक्षांनी 5 वर्षे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी'
तिवसा नगरपंचायत होण्याअगोदर ग्रामपंचायत होती. त्यावेळी येथे शिवसेना सत्तेत होती. आठ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार झाली मात्र, ही पाणी पुरवठा योजना अर्धवटच राहिली. जलशुद्धीकरण यंत्रणाही पाहिजे तशी झाली नाही. परिणामी वर्धा नदीतून येणाऱ्या पाण्याचे चांगल्या प्रकारे शुद्धीकरण होत नाही, असा आरोप वारंवार होतो.


आनंदवाडी परिसरात असलेल्या या पाणी पुरवठा योजनेकडे नगरपंचायत, प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नरेंद्र विघ्ने यांनी केला. शहरातील नागरिकांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा करून प्रशासन त्यांच्या आरोग्याशी खेळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details