महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati Rape Case : धक्कादायक, 56 वर्षीय महिलेचा बलात्कार करून मृतदेह रजईत गुंडाळला.. - मृतदेह रजईत गुंडाळला

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत 56 वर्षीय एका अल्पसंख्यांक असहाय्य महिलेवर बलात्कार करून 32 वर्षीय युवकाने तिचा खून केला. खुनानंतर त्या महिलेचा मृतदेह स्वतःच्या घरातच कपड्यात गुंडाळून ठेवल्याची घटना शुक्रवारला पथ्रोट ( Amravati Rape Case ) येथे घडली. सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान घडलेली ही घटना शनिवारी उजेडात आली.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 26, 2022, 10:32 PM IST

अमरावती : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत 56 वर्षीय एका अल्पसंख्यांक असहाय्य महिलेवर बलात्कार ( 56 year old woman raped ) करून 32 वर्षीय युवकाने तिचा खून केला. खुनानंतर त्या महिलेचा मृतदेह स्वतःच्या घरातच कपड्यात गुंडाळून ठेवल्याची घटना शुक्रवारला पथ्रोट येथे घडली. सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान घडलेली ही घटना शनिवारी उजेडात आली.


आरोपीला अटक - मृतक महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तांबटकर पुरा पथ्रोट येथील आरोपी विशाल जगन्नाथ नांदुरकरला (32) पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात भादंवि कलम 302, 376 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पथ्रोट पोलीस करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात वाढ केली.


घटना अशी आली समोर - घटनेनंतर आरोपी दारूच्या नशेत सायंकाळी पोलीस ठाण्याकडे फिरत असताना अनावश्यक बडबड करू लागला. या बडबडीत माझ्या घरात ती महिला पाय घसरून पडली अन् मेली असेही तो या बडबडीत बोलून गेला. लगेच त्याला थांबवून ठेवत त्याची दखल पोलिसांनी घेतली. आणि पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला. तेव्हा त्याला ती महिला दिसली नाही. दरम्यान घरातील गादी आणि रजई खाली पडलेली दिसली. पोलीस कर्मचाऱ्याने ती रजई, गादी सरकवून बघताच महिलेचा मृतदेह दिसून आला. आणि लागलीच पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.


कापडाने गळा घोटला - आरोपीने त्या अपंग महिलेचा कापडाने गळा घोटला. यातच ती ठार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी भादवी 302, 376 कलमान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी पोलिसांना शवविच्छेदन अहवालासह वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. या वैद्यकीय अहवालातूनच काही महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

तीन दिवसाची पोलीस कोठडी - आरोपीस पथ्रोट पोलिसांनी शनिवारला अचलपूर न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने आरोपी तीन दिवसाची 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details