अमरावती - जिल्ह्यातील वलगाव पुनर्वसन वसाहत बाजारपुरा वॉर्ड क्रमांक ४ या वस्तीत सकाळी शॉर्टसर्किट ने २ सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूचे ४० ते ४५ घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ही सगळी घरे कुडा-मातीची व टीन पत्र्यांची होती. यात घरातील उपयोगी वस्ती जळून खाक झाले आहेत. यामुळे ४५ कुटुंब उघड्यावर आली आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ बंब घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या आग नियंत्रणात आणली आहे, मात्र या सर्व घरातील घरगुती साहित्य, कपडे रोख रक्कम, दागिने व विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे जळून राख झाली आहेत. या आगीत काही गाई व म्हशींचासुद्धा होरपळून मृत्यू झाला. या आगीमुळे ४० ते ५० कुटुंब रस्त्यावर आले आहेत.
2007 मध्ये वालगाव येथील पेढी नदीचे पुनर्ववसन झाले होते मात्र या पुनर्वसनामध्ये अनेक नागरिक अजुनपर्यंत उपेक्षित आहेत. त्यांचे पूर्णपणे पुनर्वसन झाले नाही त्यांना पक्के घरे नाही. त्यांना गेली दहा वर्षांपासून योग्य न्याय मिळाला नाही. म्हणून त्यांचे घरे कुडा-मातीचे घरे आहेत. आमच्या घरात वर्षभरासाठी लागणारे धान्य भरलेले होते. घरातील पूर्ण साहित्य जळून खाक झाले, आमचे पैसेसुद्धा जाळून खाक झाले, असे यावेळी महिलांनी सांगीतले.