महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात ३ वाजेपर्यंत ५१.९४ टक्के तर बडनेरा मतदारसंघात ३९.७७ टक्के मतदान - महाआघाडी

अमरावती लोकसभा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.४७ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वाधिक ५१.९४ टक्के मतदान मेळघाट विधानसभा मतदारसंघात झाले असून बडनेरा विधानसभा मतदार संघात केवळ ३९.७७ टक्के मतदान झाले.

मतदान करण्यासाठी आलेले मतदार

By

Published : Apr 18, 2019, 8:11 PM IST

अमरावती - लोकसभा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.४७ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वाधिक ५१.९४ टक्के मतदान मेळघाट विधानसभा मतदारसंघात झाले असून बडनेरा विधानसभा मतदार संघात केवळ ३९.७७ टक्के मतदान झाले.

अमरावती मतदार संघात एकूण १८ लाख ३० हजार ५८३ मतदार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदार संघातील २ हजार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अमरावती विधसनसभा मतदार संघात ४२.३३ टक्के मतदान झाले. तर तिवसा ४५.३०, दर्यापूर ४७.७९, अचलपूर विधानसभा मतदार संघात ४८.१० टक्के मतदान झाले आहे. अमरावती मतदार संघात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा आणि महायुतीचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details