अमरावती - जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मेळघाटातील चिखलदरा-धारणी या दोन तालुक्यात तीन महिन्यांत तबल 49 बालकांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता भाजप आमदार प्रताप अडसड यांनी आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बालमृत्यूला रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार प्रताप अडसड यांनी केली आहे. सोबतच प्रशासनदेखील योजना व्यवस्थित राबवत नसल्याचा आरोप आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण -
मेळघाटात मागील तीन महिन्यांत तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर एप्रिल 2020 ते मार्च 2021 या एक वर्षाच्या कालावधीत मेळघाटातील तब्बल 213 बालमृत्यू व 10 मातांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च करत आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मागील तीन महिन्यांत तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मृत बालकांमध्ये 29 दिवस ते एक वर्षापर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे.
'बालरोग तज्ज्ञ पाठवण्यात सरकार अपयशी' -