अमरावती- कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात 43वर पोचली असून यापैकी 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता अमरावती आता 'रेड झोन'मध्ये आला आहे.
अमरावती 'रेड झोन'मध्ये; कोरोनाग्रस्तांची संख्या 43, 7 दगावले - amravati corona
अमरावतीत कोरोनाचा पहिला रुग्ण 3 एप्रिलला समोर आला होता. तेव्हापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 30 एप्रिलला एकाच दिवशी 12 कोरोना रुग्ण आढळून आले.

अमरावतीत कोरोनाचा पहिला रुग्ण 3 एप्रिलला समोर आला होता. तेव्हापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 30 एप्रिलला एकाच दिवशी 12 कोरोना रुग्ण आढळून आले. आज अमरावती शहरात 3 कोरोना रुग्ण आढळून आले तर जिल्ह्यातील वरूड येथील खासगी रुग्णालयात दाखल महिलेला गुरुवारी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्यावर ती कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल नागपूरला प्राप्त झाला आहे.
अमरावती शहरातील सुफियाननगर परिसरात 22 वर्षीय तरुण, नालसाबपुरा परिसरातील 10 वर्षीय बालक आणि हैदरपुरा परिसरातील 26 वर्षीय महिला आज कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आणखी 419 अहवाल प्रतीक्षेत असून अमरावतीची परिस्थिती सध्या हाताबाहेर जात असून अमरावती रेडझोनमध्ये आले आहे.