महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...त्या दिवशी भाजपचे 40 आमदार आमच्याकडे असतील; बच्चू कडूंचा खळबळजनक दावा - बच्चू कडू अमरावती बातमी

ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणतील की, मी सक्षम विरोधीपक्षनेता आहे. त्या दिवशी आमच्या संपर्कात असलेल्या भाजपच्या त्या 40 आमदारांची यादी आम्ही दाखवू, असा दावा कडू यांनी केला आहे. बच्चू कडू हे शिवसेनेच्या कोठ्यातून मंत्री असून त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

bacchu kadu
बच्चू कडू

By

Published : Jul 31, 2020, 7:22 PM IST

अमरावती- महाविकासआघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, अशा प्रकारचे अनेक वक्तव्य विरोधी पक्षातील नेत्यांनी मागील काही दिवसात केले. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण सक्षम विरोधी पक्षनेता असून आपली भूमिका पाच वर्ष सक्षमपणे पार पाडू शकू असे सांगावे, त्याच वेळी त्यांच्या पक्षातून फुटलेल्या 40 आमदारांची यादी आमच्याकडे असेल, असा खळबळजनक दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात..

एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यात दोन दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेनेसोबत सरकार स्थापन करण्याची तयार दाखवली. मात्र, अशी कुठलीही तयारी नसल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खळबळजनक दावा करत भाजपने 40 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणतील की, मी सक्षम विरोधीपक्षनेता आहे. त्या दिवशी आमच्या संपर्कात असलेल्या भाजपच्या त्या 40 आमदारांची आम्ही दाखवू, असा दावा कडू यांनी केला आहे. बच्चू कडू हे शिवसेनेच्या कोठ्यातून मंत्री असून त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details