महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दानापूरच्या 'त्या' 100 ग्रामस्थांचे आंदोलन मागे, मिळणार 4 लाखांची मदत

रस्ता अडवणूक प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणात आठ दिवसात निर्णय देऊ आणि सोयाबिन गंजी जाळण्याच्या प्रकरणातील आरोपींना अटक करू, असे पोलीस अधीक्षक (ग्रा.) अविनाश बारगळ यांनी सांगितले. तर समाज कल्याण आयुक्त सुनिल वारे यांनी सोयाबिन गंजी जाळल्याच्या प्रकरणी पीडित शेतकऱ्याला ४ लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर दानापूरच्या या गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दानापूर ग्रामस्थ
दानापूर ग्रामस्थ

By

Published : Oct 24, 2021, 10:23 AM IST

अमरावती -अत्याचाराला कंटाळून दानापूरच्या काही गावकऱ्यांनी शुक्रवारी गाव सोडल्याच्या प्रकरणाचा प्रश्न सुटला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अमरावती दौऱ्यावर असताना त्वरीत दखल घेत याप्रकरणी कार्यवाही करण्याच्या सूचना अमरावती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना दिल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

दानापूर ग्रामस्थ आंदोलन

आर्थिक मदत

अमरावती ग्रामिण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी शनिवारी रात्री ८ वाजता चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूरच्या त्या पीडित गावकऱ्यांची भेट घेतली. रस्ता अडवणूक प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणात आठ दिवसात निर्णय देऊ आणि सोयाबिन गंजी जाळण्याच्या प्रकरणातील आरोपींना अटक करू, असे पोलीस अधीक्षक (ग्रा.) अविनाश बारगळ यांनी सांगितले. तर समाज कल्याण आयुक्त सुनिल वारे यांनी सोयाबिन गंजी जाळल्याच्या प्रकरणी पीडित शेतकऱ्याला ४ लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर दानापूरच्या या गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वहीवाटीचा रस्ता केला होता बंद

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील या बांधवांची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदनच्या एक शेतापलीकडे यांची शेती आहे. मात्र गावातील काहीजणांनी या समुहास त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला होता. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली होती. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवला जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यासंबंधीची तक्रारही दाखल करण्यात आली, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप या समुहाने केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details