महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीला चार लाख लसी मिळाल्या तरच आटोक्यात येईल तरुणांची झुंबड; 24 तासात संपल्या 25 हजार मात्रा - अमरावती कोरोना लसीकरणाची स्थिती

लसीच्या तुलनेत लस घेणाऱ्यांची संख्या कैक पटीने वाढली असल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत असताना आता प्रशासनाला 1 मे पासून 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसह 18 ते 45 वर्ष वयोगटातील सर्वाना लस देताना कशा अडचणी येतील आणि त्यांचा सामना करायचा कसा? याची चिंता लागली आहे. खरं तर पहिल्या दिवशी एकूण चार लाख लसी उपलब्ध झाल्या तरच तरुणांची झुंबड आटोक्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमरावती
अमरावती

By

Published : Apr 27, 2021, 10:00 PM IST

अमरावती- जिल्ह्याला सोमवारी मिळालेल्या 25 हजार लसी मंगळवारी म्हणजे अवघ्या 24 तासात नागरिकांना टोचून संपल्या. लसीच्या तुलनेत लस घेणाऱ्यांची संख्या कैक पटीने वाढली असल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत असताना आता प्रशासनाला 1 मे पासून 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसह 18 ते 45 वर्ष वयोगटातील सर्वाना लस देताना कशा अडचणी येतील आणि त्यांचा सामना करायचा कसा? याची चिंता लागली आहे. खरं तर पहिल्या दिवशी एकूण चार लाख लसी उपलब्ध झाल्या तरच तरुणांची झुंबड आटोक्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमरावती लसीकरण स्थिती
कोरोनाची ही दुसरी लाट खरं तर पहिल्या लाटेपेक्षा अधिक जीवघेणी ठरली आहे. यामुळे मरणाच्या धास्तीने कोरोनापासून आपला बचाव व्हावा, यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळते आहे. सद्या 45 आणि 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण होत नसून शहर असो वा ग्रामीण भाग सर्वच ठिकाणी लस घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांवर येत आहेत.
असे आहेत दर
केंद्र शासनाकडून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लस प्रत्येकी सद्या 150 रुपयाला मिळत आहे. शासकीय आणि खासगी या दोन्ही क्षेत्रासाठी जिल्हा लस भांडार येथेच लस येत असून इथूनच लसीचे वितरण केले जाते. ही लस शासकीय रुग्णालयात मोफत दिली जाते तर खासगी रुग्णालयात 250 रुपयात मिळते. आता पुढे केंद्र शासनाकडून या लसींसाठी प्रत्येकी 416 रुपयात मिळणार असून खासगी रुग्णालयात या लसींसाठी 600 रुपये मोजावे लागणार आहेत.
वितरणात अनेकांचा दबा..!
शासकीय आणि खासगी क्षेत्रात लस वितरणासाठी राजकीय तसेच वरिष्ठ स्तरांवरून दबाव येत असल्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी सांगतात. खरंतर शासकीय आणि खासगी वितरण हे वेगवेगळे असावे म्हणजे भानगड उरणार नाही आणि यामुळे लसीचे योग्य नियोजन शक्य होईल, असेही काही अधिकारी दबक्या आवाजात सांगतात.
लसीचे असे झाले वितरण
26 एप्रिलला जिल्हा लस भांडार येथे आलेल्या 25 हजार लसीचे एकूण 135 केंद्रांवर वितरण करण्यात आले. अमरावती महापालिकेचे 13 केंद्र, 11 खासगी रुग्णलाय, 69 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 14 ग्रामीण रुग्णल्यात लस वितरित करण्यात आली.
संख्यानिहाय वितरण
  • अमरावती महापालिका : 5000
  • अमरावती आरोग्य विभाग। : 1450
  • अचलपूर : 1000
  • अंजनगव सुर्जी : 900
  • दर्यापूर : 1200
  • धारणी : 1000
  • चिखलदरा : 800
  • मोर्शी : 1200
  • वरुड : 1500
  • तिवसा : 1000
  • चांदुर रेल्वे : 1000
  • धामणगाव रेल्वे : 1200
  • भातकुली। : 1000
  • चांदूर बाजार : 1000
  • नांदगाव खांडेश्वर : 950
  • जिल्हा सामान्य रुग्णालय : 800

    खासगी रुग्णालय
  • अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल : 400
  • आरोग्यम रुग्णालयात : 450
  • संकल्प रुग्णालय : 400
  • सुईन रुग्णालय : 400
  • हाय टेक सेंटर : 400
  • मातृछाया रुग्णालय : 400
  • पारश्री हॉस्पिटल : 400

ABOUT THE AUTHOR

...view details