महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटातील तीन आदिवासी बालकांना दुधातून विषबाधा - अमरावती दुधामुळे बालकांना विषबाधा बातमी

शिळे दूध पिल्याने एकाच कुटुंबातील तीन लहान बालकांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dharni hospital
Dharni hospital

By

Published : Aug 4, 2020, 3:30 PM IST

धारणी (अमरावती) -तालुक्यातील घोटा गावातील एकाच कुटुंबातील 10 वर्षाच्या आतील तीन बालकांना दुधातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. घोटा गावातील गणेश बेठेकर (वय 3 वर्षे), कृती बेठेकर (वय 5 वर्षे) व करीना बेठेकर (वय 9 वर्षे), असे विषबाधा झालेल्या बालकांची नावे आहेत.

धारणी तालुक्यातील घोटा गावातील हे तीन बालकांनी आज (दि. 4 ऑगस्ट) सकाळी दूध पिले. पण, ते दूध शिळे असल्याने त्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बालकांनी दूध पिल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ जवळीलच उतावली येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर असल्याने या तिन्ही बालकांवर सध्या धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details