अमरावती- चिखलदरा तालुक्यातील बामादेही येथील गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय गुराख्यावर ३ अस्वलांनी हल्ला केला आहे. या घटनेत गुराखी गंभीररित्या जखमी झाला आहे. सुखदेव कास्देकर (वय ४५ रा. बामादेही) असे जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
चिखलदऱ्यात गुराख्यावर ३ अस्वलांचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी - अस्वल हल्ला गुराखी चिखलदारा
घटनेत गुराखी गंभीररित्या जखमी झाला आहे. सुखदेव कास्देकर (वय ४५ रा. बामादेही) असे जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
गुराखी हल्ला चिखलदरा
हल्ल्यात सुखदेव यांच्या डोक्यासह पाठ, मान व हातावर जखमा झाल्या आहेत. त्यांना चुरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
हेही वाचा-अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या कौंडण्यपुरातील पुलाचे पुरामुळे मोठे नुकसान