महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रक्तदान करुन परतणाऱ्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोन जण जागीच ठार - amaravti accident news

कु-हापासून दोन किलोमीटर अंतरावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार अचनाक डांगे यांच्या शेतात घुसली. हा अपघात इतका मोठा होता की कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात
अपघात

By

Published : Apr 3, 2021, 6:13 PM IST

Updated : Apr 3, 2021, 7:47 PM IST

अमरावती- आर्वी मार्गावर कु-हापासून दोन किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. मिलिंद पिंपळकर(३२) आर्वी व भुषण चाफले(२४) नादंपूर(ता.आर्वी) अशी दोघांची नावे आहेत.

भीषण अपघातात दोन जण जागीच ठार

दोघांचा जागीच मृत्यू
भुषण व मिलिंद हे दोघेही एम एच ३२ ए एच ५६१७ या चार चाकीने अमरावतीला आपल्या नातेवाईकांना रक्त देण्यासाठी आले होते. रक्तदान केल्यानंतर घरी परत येत असताना कु-हापासून दोन किलोमीटर अंतरावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार अचनाक डांगे यांच्या शेतात घुसली. हा अपघात इतका मोठा होता की कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कु-हा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. दोघांचे मृतदेह शविवच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार ईश्वर वर्गे करत आहे.

हेही वाचा -आम्ही सरकारसोबत, मात्र लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा - उपाध्ये

Last Updated : Apr 3, 2021, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details