अमरावती - जिल्ह्यात तालुकास्तरावर पहिले २५ बेडचे खासगी कोविड रूग्णालय चांदूर रेल्वे येथे माझी माय हॉस्पीटलमध्ये सुरू झाले आहे. आज स्वातंत्र्यदिनी आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते थाटात उद्घाटन पार पडले आहे.
चांदूर रेल्वेतील माझी माय हॉस्पीटल बनले २५ बेडचे कोव्हिड रूग्णालय - तालुकास्तरावर पहिले २५ बेडचे खासगी कोव्हिड रूग्णालय सुरू
अमरावती जिल्ह्यात आज चांदूर रेल्वे येथे तालुकास्तरावर पहिले २५ बेडचे खासगी कोव्हिड रूग्णालय सुरू करण्यात आले. सर्व मेडीकल यंत्रसामुग्री सहित सुजज्ज हॉस्पीटल तयार करण्यात आल्यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांची सोय होणार आहे.
चांदूर रेल्वे शहरातील अमरावती बायपास रोडवर असलेल्या माझी माय मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलची महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त खासगी कोव्हिड हॉस्पीटलसाठी निवड करण्यात आली. यानंतर स्वातंत्र्यदिनी आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते फित कापून या कोव्हिड हॉस्पीटलचे रितसर उद्घाटन करण्यात आले. या हॉस्पीटलमध्ये ८ आयसीयू बेड, महिलांसाठी ६ बेड, पुरूषांकरिता ८ बेड व एक १ अतिदक्षता बेड असे एकुण २५ बेड राहणार आहे. तसेच सर्व मेडीकल यंत्रसामुग्री सहित सुजज्ज हॉस्पीटल तयार करण्यात आले आहे.
रूग्णांच्या सेवेकरिता डॉ. स्वप्निल मोलके (एमडी, मेडीसीन) व डॉ. अनुप डोंगरे (एमबीबीएस) यांच्यासह ६ निवासी डॉक्टर, ८ परिचारिका व इतर ४ कर्मचारी राहणार असल्याची माहिती माझी माय हॉस्पीटले संचालक डॉ. राजेंद्र ठाकुर यांनी दिली.