अमरावती - साबनपुरा येथील जामा मरकज मशिदीत गेल्या अनेक महिन्यांपासून लपून बसलेल्या 18 परदेशी नागरिकांपैकी 11 जणांचा 'स्वॅब' चाचणी अहवाल 'निगेटिव्ह' आला असून चौघांचे स्वॅब पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
18 परदेशी नागरिकांपैकी 11 जणांचा अहवाल 'निगेटिव्ह'; चौघांच्या स्वॅबची पुन्हा होणार तपासणी - amravati latest news
या सर्वांकडे प्रवासी व्हिसा आहे. प्रवासी व्हिसाचा वापर केवळ पर्यटनसाठी असताना हे सर्व 18 व्यक्ती साबनपुरा परिसरातील मरकज मशिदीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
कोरोनाची भारतात लागण होण्यापूर्वीच हे 18 जण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला भारतात आले आहेत. येथील साबनपुरा परिसरात म्यानमारवरून आलेले 10 व्यक्ती ज्यात 5 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. तसेच अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेमधून प्रत्येकी एक आणि टोगोलाईन्स देशातून 6 असे एकूण 18 परदेशी नागरिकांचे अमरावतीत वास्तव्य होते. या सर्वांकडे प्रवासी व्हिसा आहे. प्रवासी व्हिसाचा वापर केवळ पर्यटनसाठी असताना हे सर्व 18 व्यक्ती साबनपुरा परिसरातील मरकज मशिदीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
खोलपुरी गेट पोलिसांनी या सर्व 18 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व परदेशी नागरिकांना मुलींच्या शासकीय वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वब चाचणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. यापैकी 11 जणांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळली नाही. तर चौघांच्या स्वॅबबाबत काहीसा संशय असल्यामुळे त्यांचे स्वॅब पुन्हा एकदा चाचणीसाठी नागपूरला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. 18 पैकी इतर तिघांच्या स्वॅब चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.