महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आई-बापाला ओझे नको म्हणून चिठ्ठी लिहून १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; अमरावतीतील घटना - 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

आई-वडिलांना ओझे नको म्हणून मी हे जीवन संपवित आहे, अशी सुसाईड नोट लिहून 17 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपविले. तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छिदवाडी येथील १७ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

girl suicide
girl suicide

By

Published : Oct 22, 2021, 8:28 PM IST

अमरावती -आई-वडिलांना ओझे नको म्हणून मी हे जीवन संपवित आहे, अशी सुसाईड नोट लिहून 17 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपविले. तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छिदवाडी येथील १७ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सेजल गोपाल जाधव असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

सुसाईड नोट
चिट्ठी लिहून व्यक्त केल्या भावना -
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सेजल ने स्वत:च्या भावना व्यक्त केल्या आहेत. वडिलांना शेतमजुरी व तीन एकर शेती करून घराचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात सतत होत असलेली नापिकी, घरातील हालाखीची आर्थिक परिस्थिती त्यामुळे उदरनिर्वाह होत नाही. त्यातही आम्ही दोन बहिणी, एक लहान भाऊ अशा सर्वांच्या पोटाचा प्रश्न बिकट होत आहे. आताची महागाई, आमचे शिक्षण हे सर्व करत असताना आई, वडिलांना फार कष्ट करावे लागतात. त्यामुळे माझे ओझे कमी व्हावे, याकरिता मी आपले जीवन संपवीत आहे. असे लिहून सेजलने आपल्या घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

सुसाईड नोट
पोलीस चौकशी सुरू -
घटनास्थळाचा पंचनामा करत असताना मृतदेहाच्या जवळ एक चिट्ठी मिळाली. या चिट्ठीवरून गरिबीला कंटाळून संबंधित मुलीने आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. तरी या घटनेची चौकशी आम्ही करत आहोत. घटनास्थळावरून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून तिच्या मैत्रिणींकडूनही माहिती घेण्यात येत असल्याची माहिती कुऱ्हा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details