महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्या; 1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजार फुटांचे पत्र - Bharat Ratna to Punjabbarao Deshmukh

विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये हे पत्र लिहले आहे. त्यांच्या मनात भाऊसाहेबांप्रती असलेल्या भावना या चिमुकल्यांनी आपल्या लिखानातून व्यक्त केल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्या सुहासिनी शेंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पत्राचे अनावरण करण्यात आले.

letter
नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजार फुटाचे पत्र

By

Published : Dec 25, 2019, 9:52 AM IST

Updated : Dec 25, 2019, 3:13 PM IST

अमरावती -भारताचे पाहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी 1500 विद्यार्थ्यांनी तब्बल तीन हजार फुटांचे पत्र लिहले आहे. नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला.

नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजार फुटाचे पत्र

विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये हे पत्र लिहले आहे. त्यांच्या मनात भाऊसाहेबांप्रती असलेल्या भावना या चिमुकल्यांनी आपल्या लिखानातून व्यक्त केल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्या सुहासिनी शेंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पत्राचे अनावरण करण्यात आले.

हेही वाचा -विनोद तावडेंनी ज्या विद्यार्थ्याला म्हटले होते, झेपत नसेल तर शिकू नको; त्याने सुवर्ण पदक मिळवून दिले असे उत्तर

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वाला देशातील सर्वोच्च सन्मान मिळावा यासाठी चिमुकल्यांनी हे पाऊल उचलले आहे. असे उपक्रम इतर शिक्षण संस्थांमध्येही राबवले जावेत. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून मुलांच्या भावना केंद्र सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी यावेळी दिले आहे.

Last Updated : Dec 25, 2019, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details