अमरावती - जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील निम्म वर्धा प्रकल्पाचे 33 पैकी 15 दरवाजे रात्री 11 वाजताच्या सुमारास उघडण्यात आले. या 15 दरवाजांमधून 156 क्युसेक पाणी हे वर्धा नदी जलपत्रात सोडन्यात आले. त्यामुळे नदीकाठारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून निम्म वर्धा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यातच मध्यप्रदेशातही दमदार पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे असलेले अप्पर वर्धा धरण हे 95 टक्के भरले आहे. त्यामुळे याही धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे ते पाणी निम्मं वर्धा प्रकल्पात येत असल्याने 33 पैकी 15 दरवाजे हे उघडण्यात आले. दरम्यान, या निम्म वर्धा जल प्रकल्पात सध्या 75 टक्के इतका जलसाठा आहे.