अमरावती- शहरात युवा स्वाभिनान पक्षाच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नागरिकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे एक बैल, याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कारण, हा बैल आहेच तसा ऐटीचा. या बैलाचे नाव आहे गजा. हा बैल सर्वांचे आकर्षण ठरत आहे या मागचे महत्वाचे कारण म्हणजे त्या बैलाचे वजन आहे तब्बल 1 टन त्यामुळे या कृषी प्रदर्शनात सध्या फक्त गज्या बैलाचीच हवा आणि चर्चा दिसून येत आहे.
गजाची झलक, सबसे अलग..! तब्बल टनभर वजनाचा बैल ठरतोय अमरावतीतील प्रदर्शनाचे आकर्षण - १२०० किलोचा गजा बैल
हा बैल सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील कृष्णा सायमोते यांच्या मालकीचा आहे. त्यांनी या हत्तीसारख्या बैलाचं नाव गजा असे ठेवले आहे.
हा बैल सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील कृष्णा सायमोते यांच्या मालकीचा आहे. त्यांनी या हत्तीसारख्या बैलाचं नाव गजा असे ठेवले आहे. या बैलाची उंची साडेसहा तर लांबी तबल साडेदहा फुट आहे. तर याचे वजन 1200 किलो आहे. गजाला दिवसाला 50 किलो गाजर, 100 किलो ऊस अन् 50 किलो चारा लागतो.
गज्याला पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्याला विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या प्रदर्शनांमध्ये मोठी मागणी आहे. तर हा आगळा-वेगळा बैल जन्माला येण्याचे कारण म्हणजे, आनुवंशिकता असल्याचे मत माजी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.