अमरावती - चांदुर रेल्वे मार्गावरील बासलापूर येथील मच्छी तलावाजवळ भरधाव कार अपघात झाल्याची घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून ही कार खाली घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात प्रशांत तायवाडे या 39 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. नवीन वर्षात आतापर्यंत या मार्गावर तीन अपघात झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभरात याच मार्गावर एकूण 19 अपघात झाले आहेत. त्यापैकी 11 जणांवर काळाने घाला घातला तर ८ जण जखमी झाले होते. जखमींमध्ये अनेकांना अपंगत्वालाही सामोरे जावे लागले.
चांदुर रेल्वे रस्त्यावर वर्षभरात 19 अपघातात 11 जण ठार
चांदुर रेल्वे मार्गावरील बासलापूर येथील मच्छी तलावाजवळ भरधाव कार अपघात झाल्याची घटना घडली आहे.नवीन वर्षात आतापर्यंत या मार्गावर तीन अपघात झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभरात याच मार्गावर एकूण 19 अपघात झाले आहेत. त्यापैकी 11 जणांवर काळाने घाला घातला तर ८ जण जखमी झाले होते. जखमींमध्ये अनेकांना अपंगत्वालाही सामोरे जावे लागले.
साईट पट्ट्या न भरल्याने अपघात
सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभराचा कालावधी लोटूनही या रस्त्यावर साईट पट्ट्या टाकल्या नसल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अजून किती बळी घेणार, असा प्रश्नही वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. वर्षभरापूर्वी चांदुर रेल्वे-अमरावती या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने साइड पट्ट्या न भरल्यामुळे भरधाव वाहने रस्त्यावरून खाली उतरून अपघात होत आहेत. यात अनेकांना गंभीर दुखापत देखील झाली आहे. दोन दिवसांपूर्वी या रस्त्यावरून चारचाकी खाली उतरून पलटी झाल्याने प्रशांत तायवाडे या युवकाला आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे नवीन वर्षातील हा सलग तिसरा अपघात असून दोघांवर गंभीर जखमी होण्याची वेळ आली आहे. मात्र आता तरी जीवघेण्या रस्त्याकडे बांधकाम विभाग लक्ष देणार का हा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा -शेतकरी आंदोलन: दिल्लीच्या सीमेवर आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या