अमरावती- मसाल्याच्या व्यापारात अधिक नफा असल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना अमरावतीच्या चांदूर बाजार शहरात उघडकीस आली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी हरीश देवराव दिपाळे, जगदीश देवराव दिपाळे व अमोल जगदीश दिपाळे ( रा.स्टार चौक चांदूर बाजार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मसाला व्यापाराचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांची फसवणूक; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल - CHANDUR BAJAR
आरडी व एलआयसी एजंट असल्याचे सांगून मसाला व्यवसायात पैसे गुंतवा फार अधिक नफा आहे, असे या तिघांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चौधरी यांची या तिघांनी तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अमरावती
मसाला व्यापाराचे आमिष दाखवून साडे अकरा लाखांची फसवणूक
अमरावतीच्या चांदूर बाजार येथील आठवडी बाजारात अमोल चंद्रकांत चौधरी हे भोजनालय चालवतात. आरडी व एलआयसी एजंट असल्याचे सांगून मसाला व्यवसायात पैसे गुंतवा फार अधिक नफा आहे, असे या तिघांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चौधरी यांची या तिघांनी तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
चौधरी यांनी पैसे मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. यानंतर तक्रारीवरून तिघांविरुद्ध अमरावतीच्या चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.