अमरावती - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरात कोरोना नियत्रणांसाठी तब्बल २५० तरूण तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीला १० फिस्क पॉईंटवर प्रत्येकी ४ तास ४ तरूणाचा कडा पहारा आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग ठरला आहे, या दरम्यान जुळ्या शहराच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.
अमरावती शहरातील लागण झालेल्या परिसरातून नागरिक आता ग्रामीण भागातील नातेवाईक, मुळ गावांकडे आश्रयासाठी कूच करीत आहेत. त्यामुळे परतवाडा, अचलपूर शहरात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाने दुचाकीस्वारावर बंदी घातली आहे. बाहेरगावावरून येणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शहरातील २५० तरुण पुढे सरसावले आहेत. परतवाडा, अचलपूर शहरातील १० जिममधून हे युवक निवडले आहेत, अशी माहिती सदानंद मानकर,पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.
अमरावतीच्या परतवाडा शहरात पोलिसांसोबत आता २५० तरूण रस्त्यावर
बाहेरगावावरून येणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत शहरातील २५० तरुण पुढे सरसावले आहेत. परतवाडा, अचलपूर शहरातील १० जिममधून हे युवक निवडले आहेत.
अमरावतीच्या परतवाडा शहरात पोलिसांसोबत आता २५० तरूण रस्त्यावर
चांदूर बाजार नाका अचलपूर नाका, मिल स्टॉप, एल आय सी चौक, वाघा माता चौक, रेस्ट हाऊस चौक, टिळक चौक, महावीर चौक, दुराणी चौक, जयस्तंभ चौक, बस स्टँड अशा फिक्स पॉईंटवर हे कर्मचाऱ्यांच्या मदतीला तैनात करण्यात आले आहेत.