महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धसका; २१ दिवसापासून अंजनगावात अडकलेल्या तरुणाचा जेवणास नकार - migrants in amravati

मध्यप्रदेश येथील काही युवक अहमदनगरवरुन बैतूल जिल्ह्यातील त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी पायी ५४० किलोमीटरचा रस्ता तूडवत अंजनगाव सूर्जीपर्यंत पोहोचले. परंतु येथील प्रशासनाने त्यांना अंजनगांव शहरात थांबवून क्वारंटाईन केले. १४ एप्रिलला आपली सूटका होईल या आशेवर असलेल्या या युवकांना आता तब्बल २१ दिवस झाले. परंतु प्रशासनाने त्यांच्या जाण्यासंदर्भात अजून कोणताही निर्णय घेतला नाही.

२१ दिवसापासून अंजनगांवात अडकलेल्या युवकांचा जेवणास नकार
२१ दिवसापासून अंजनगांवात अडकलेल्या युवकांचा जेवणास नकार

By

Published : Apr 24, 2020, 10:29 AM IST

अमरावती - गेल्या २१ दिवसांपूर्वी अहमदनगर येथून बैतूलसाठी निघालेल्या आणि अंजनगाव सूर्जी येथे प्रशासनाने थांबावून ठेवलेल्या १० युवकांनी आम्हाला आमच्या गावाला सोडून द्या, अन्यथा आम्ही जेवणही करणार नाही, असा हट्ट धरल्याने प्रशासन आता काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशात मोलमोजुरीसाठी गेलेल्या नागरिकांनी आपल्या घराकडे वाटेल त्या साधनाने जाण्याचा निर्णय घेतला. त्यातच मध्यप्रदेश येथील काही तरुण अहमदनगरवरुन बैतुल जिल्ह्यातील त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी पायी ५४० किलोमीटरचा रस्ता तूडवत अंजनगाव सूर्जीपर्यंत पोहोचले. परंतु येथील प्रशासनाने त्यांना अंजनगांव शहरात थांबवून क्वारंटाईन केले. १४ एप्रिलला आपली सूटका होईल, या आशेवर असलेल्या या तरुणांना आता तब्बल २१ दिवस झाले. परंतु प्रशासनाने त्यांच्या जाण्यासंदर्भात अजून कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या तरुणांनी जेवणावर बहिष्कार टाकला आहे.

आम्हाला २१ दिवसापासून येथे अडकवून ठेवले आहे. आमच्या संपूर्ण तापासण्या झाल्या, तरीसुद्धा आम्हाला गावी सोडण्यास प्रशासन निर्णय घेत नाही. आम्ही ५४० किमी पायी आलो, आता १०० किलोमीटरही आम्ही पायी जाऊ. आम्हाला फक्त पास द्या. गुरुवारी अंजनगाव शहरातून शेकडो नागरिक परराज्यातून प्रवास करत गेले तर, आम्हाला का परवानगी नाही, असा प्रश्न एका युवकांने 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलताना उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details