महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदान करा ! 'या' कॅफे हाऊसमध्ये मिळेल १० टक्के सवलत - Hello Corner

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी येथील कॅम्प परिसरातील हॅलो कॉर्नर या कॅफे हाऊसने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

मतदान करा ! 'या' कॅफे हाऊसमध्ये मिळेल १० टक्के सवलत

By

Published : Apr 4, 2019, 10:45 AM IST

अमरावती- लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी येथील कॅम्प परिसरातील हॅलो कॉर्नर या कॅफे हाऊसने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या कॅफेचे संचालक इरफान अथर आली यांनी १८ एप्रिलला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला १० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शहरातील समाजसेवक गोविंद कासट आणि माजी विदर्भ केसरी प्रा. संजय तिरथकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मतदान करा ! 'या' कॅफे हाऊसमध्ये मिळेल १० टक्के सवलत

या उपक्रमांतर्गत हॅलो कॉर्नर या कॅफे हाऊसमध्ये निवडणुकी दिवशी जे मतदार मतदान करून हॅलो कॉर्नरला येतील त्यांना येथे खाणे तसेच शीतपेय, कॉफी यावर १० टक्के सूट दिली जाणार आहे. मतदानाचा टक्का वाढवा यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ५ ते १० टक्के सूट दिली तर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मदत होईल, आशी भावना इरफान अथर अली यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details