अकोला :देवी विसर्जन करण्याकरिता गेलेल्या युवकावर काळाने घाला (youth died in bike accident) घातला. गांधीग्राम येथून विसर्जन करून परतताना झालेल्या अपघातातएक जन ठार, तर दोन जन गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली (youth returning from Durga immersion in Akola) आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने चार चाकी वाहन पेटवून दिले आहे.
Youth Died in Accident : दुर्गा विसर्जन करून परतणाऱ्या युवकाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू ; संतप्त जमावाने पेटविले वाहन
देवी विसर्जन करण्याकरिता गेलेल्या युवकावर काळाने घाला (youth died in bike accident) घातला. गांधीग्राम येथून विसर्जन करून परतताना झालेल्या अपघातात एक जन ठार, तर दोन जन गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली (youth returning from Durga immersion in Akola) आहे.
युवकाचा जागीच मृत्यू -दुर्गा विसर्जनाच्या दिवशी अकोट फाईल परिसरावर दुःखाचा डोगर कोसळला. अकोट फाईल परिसरात येत असलेल्या मच्छी मार्केट येथील मंडळ देवी विसर्जनासाठी गेले होते. देवीचे विसर्जन करून परत असतांना गांधीग्रामजवळ असलेल्या वल्लभनगर जवळ समोरून येणाऱ्या क्रूझरने दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यात 22 वर्षीय सूरज नंदाने, राहणार अकोट फाईल मच्छी मार्केट याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेल्या सूरज इंगळे व दिवे मेश्राम हे गँभीर जखमी (youth returning from Durga immersion Died) झाले.
संतप्त जमावाने पेटवले वाहन -अपघात घडताच, संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत असलेले वाहन पेटवून दिले. घटनेची माहिती मिळतच अकोट फाईल व दहिहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आला. मृतक सूरज नंदाने हा घरातील एकुलता एक असून खाजगी नोकरी करत होता. मनमिळाऊ असलेल्या सूरजच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली (Youth Died in Accident) आहे.