महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळापूर: लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या - Youth commits suicide

गोरेगाव बुद्रुक येथील 30 वर्षीय महिलेने युवकाविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

युवकाची आत्महत्या
युवकाची आत्महत्या

By

Published : Jan 31, 2021, 8:57 PM IST

अकोला - लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे गावात कुटुंबाची बदनामी होईल, या विवंचनेत असलेल्या युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी गोरेगाव बुद्रुक येथे घडली. बाळापूर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. न्यायालयाने महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे यांनी दिली.

काय आहे प्रकरण-

गोरेगाव बुद्रुक येथील 30 वर्षीय महिलेने युवकाविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये गावातील निलेश काळींगे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातून तिला गर्भधारणा झाली. तिने ही बाब त्या युवकाला सांगितले. त्याने 'मी तो नव्हेच' अशी भूमिका घेतल्याने त्या महिलेने बाळापूर पोलीस ठाण्यात 29 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये अत्याचार केला असल्याचा गुन्हा दाखल केला होता.

महिलेला अटक करून न्यायालयात केले हजर -

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने निलेश हा व्यथित झाला. कुटुंबाची बदनामी होईल, या विवंचनेत तो होता. शेवटी त्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी मुलाच्या नातेवाईकांनी त्या महिलेविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या महिलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, असल्याचे बाळापूर पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे यांनी सांगितले.

'ती' महिला आधीच विवाहित-

ज्या महिलेमुळे हे प्रकरण घडले आहे. ती महिला आधीच विवाहित आहे. तिचे सहा वर्षाआधी लग्न झाल्याचे पोलीस निरीक्षक आव्हाळे यांनी सांगितले. तिला एक मुलगा असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा-लोकल उद्यापासून सुरू, वेळेचे पालन करून मुंबईकर साथ देतील - महापौर

ABOUT THE AUTHOR

...view details