महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किरकोळ वादातून मित्रानेच केली तरुणाची हत्या, अकोल्यातील प्रकार - latest murder news from akola

शिवाजी शाळेजवळ असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरामागील पाईपवर मंगेश यादव आणि त्याचा मित्र हे दोघे बसलेले होते. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर मित्राने मंगेशवर काठीने वार केला.

akola murder news
मित्रानेच केली मित्राची हत्या

By

Published : Jun 8, 2020, 6:34 PM IST

अकोला- किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत शहरात एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी आणखी एक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीची भररस्त्यात हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हरिहर पेठमधील शिवाजी शाळेच्या बाजूला ही घटना घडली आहे. मंगेश दलयीराम यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शिवाजी शाळेजवळ असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरामागील पाईपवर मंगेश यादव आणि त्याचा मित्र हे दोघे बसलेले होते. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर मित्राने मंगेशवर लाकडी काठीने वार केला. यात मंगेशचा जागीच मृत्यू झाला.

प्रकरणाची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आरोपी मित्र फरार झाला होता. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details