अकाेला -एका माॅलमध्ये पत्नी एका युवकासाेबत खरेदीसाठी आल्याच्या माहितीवरुन संतापलेल्या पतीने त्याच मॉलमध्ये युवकावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (काल) रात्री उशीरा घडली़. या हल्ल्यात युवक गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्या युवकाला वाचविण्यासाठी पत्नीनेही पतीला ढकलून पतीच्या हातातील धारदार शस्त्र फेकून दिले. शस्त्र उचलून पतीवरही पत्नीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघे जखमी झाले आहे. राजेश वामनराव लाखे असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे, तर विशाल उत्तम राठोड असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
राजेश लाखे याची पत्नी परिचारिका असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्कार्टरमध्ये राहते. दरम्यान (मंगळवारी) रात्री त्या बाजारपेठेत खरेदीसाठी गेले असता या ठिकाणी त्यांचा परिचीत असलेला पातूर येथील रहिवासी युवक विशाल उत्तमराव राठाेड हाही त्यांच्यासोबत होता. ते बाेलत असतांनाच परिचारीकेचा पती राजेश लाखे याने धारदार शस्त्र घेऊन विशाल राठाेड याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या राठाेडला वाचविण्यासाठी पत्नीने पतीच्या हातातील धारदार शस्त्र हिसकले. तरीही तो आवरत नसल्याने पत्नीने त्याच शस्त्राने पतीला धाक दाखविण्यासाठी त्याच्यावर हल्ला चढविला. त्यामध्ये तो किरकोळ जखमी झाला. घटनास्थळी सिटी कोतवाली पोलीस दाखल झाले. पोलिसांनी दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले. युवक गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी पथकासह घटनेचा पंचनामा केला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. जखमी पती हा पोलिसांच्या ताब्यात आहे.
परिचारीकेची पतीविरुध्द आधीच तक्रार