अकोला -परतीच्या पावसामुळे हाती आलेले सोयाबीन पीक वाया गेले, तसेच लागवडीसाठी घेतलेल्या शेतीतील पीकही संपूर्ण खराब झाल्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या अकोल्यातील एका युवा शेतकऱ्याने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल बाळू इंगळे (वय 26) असे या आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे हा शेतकरी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याच गावातील रहिवासी आहे.
अकोल्यात युवा शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या... हेही वाचा... शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर, राज्यपालांची घोषणा
अकोला तालुक्यातील पळसो बढे या गावात राहणारे अमोल इंगळे या युवा शेतकऱ्याने घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आत्महत्या करण्यामागील नेमके कारण समजू शकले नसले, तरी त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार, अमोलने कर्जबाजारीपणा आणि शेतीचे नुकसान झाल्यानंतर सरकारची कसलीही मदत वेळेवर न मिळाल्याने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा... घोडे धुण्यासाठी नदीत उतरलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पश्चात तीन बहिणी, दोन भाऊ, आई व वडील असा परिवार आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याच गावातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने, मंत्र्यांचे स्वतःच्या भागातच लक्ष नसल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपचे आमदार रणधीर सावरकर हे या भागाचे आमदार आहेत.