महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 3, 2021, 4:44 PM IST

Updated : Aug 3, 2021, 5:25 PM IST

ETV Bharat / state

अकोल्यात गळफास घेवून तरुण व्यापाऱ्याची आत्महत्या; दोघांना अटक

जुने शहरातील जयहिंद चौक परिसरात अल्पेश अरविंद उपाध्याय हा राहतो. अल्पेश हा शिवसेना शहर उपप्रमुख योगेश अग्रवाल, सुशील दांदळे आणि विशाल पुरोहित यांच्या संपर्कामध्ये नेहमीच होता. अल्पेश हा योगेश अग्रवाल याच्यासोबत तो व्यवसाय करत होता. शगुण कॅटरिंगमध्ये ते दोघेही भागीदार होते. त्यांच्यामध्ये पैशांचा व्यवहार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

अकोला आत्महत्या
अकोला आत्महत्या

अकोला -शहरातील एका युवा व्यावसायिकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात शिवसेनेचे शहर उपप्रमुख यांच्यासह दोघांवर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना शहर उपप्रमुख योगेश अग्रवाल आणि सुशील दांदळे यांना अटक करण्यात आली आहे. तर विशाल पुरोहित हा फरार आहे.

गळफास घेवून तरुण व्यापाऱ्याची आत्महत्या

काय आहे प्रकरण?

जुने शहरातील जयहिंद चौक परिसरात अल्पेश अरविंद उपाध्याय हा राहतो. अल्पेश हा शिवसेना शहर उपप्रमुख योगेश अग्रवाल, सुशील दांदळे आणि विशाल पुरोहित यांच्या संपर्कामध्ये नेहमीच होता. अल्पेश हा योगेश अग्रवाल याच्यासोबत तो व्यवसाय करत होता. शगुण कॅटरिंगमध्ये ते दोघेही भागीदार होते. त्यांच्यामध्ये पैशांचा व्यवहार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यात या कारणावरून वादही झाले होते. हे तिघे अल्पेशला त्रास देत होते. त्यामुळे त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्याने सर्व कारण स्पष्ट केले आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. यामध्ये पोलिसांनी योगेश आणि सुशील या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी विशाल पुरोहित अद्यापही फरार आहे. पुढील तपास जूने शहर पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस हे करत आहे.

हेही वाचा-नक्षलवाद्यांना विस्फोटक, हत्यार पुरवठा करणाऱ्या ८ आरोपींना अटक

Last Updated : Aug 3, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details