महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीएसटीची कार्यपद्धती नव्याने समजून घेण्यासाठी अकोल्यात २ दिवसीय कार्यशाळा - tax

सनदी लेखापाल यांची जीएसटीवर आधारित ही कार्यशाळा घेण्यात येत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अकोला शाखेचे अध्यक्ष दीपक अग्रवाल

By

Published : May 3, 2019, 9:54 AM IST

अकोला- जीएसटीच्या कायद्यात बदल करण्यासाठी ३०० ते ४०० वेळा नवीन अध्यादेश काढण्यात आले आहे. हा कायदा लागू होऊन एक वर्षही झाले नाही. या अध्यादेशामुळे व्यापारी आणि सीए यांच्यात सभ्रम निर्माण झाला. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी आणि नवीन अध्यादेशाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी २ दिवसीय जीएसटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अकोला शाखेचे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दीपक अग्रवाल

ते पुढे म्हणाले, जीएसटीमध्ये वेळोवेळी होत असलेले बदल व त्यावर कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, जीएसटीला सुरळीत कसे करता येईल. यासाठी सनदी लेखापाल यांची जीएसटीवर आधारित ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत देशातील सनदी लेखापाल यांचे तज्ञ उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल छाजेड, प्रीती सावला, उमेश शर्मा, राकेश आळशी, यशवंत कासार, जयेश काला, अपित काबरा, मनीष गादिया, अभिजीत केळकर यासारखे जीएसटीतील तज्ञ हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जीएसटी मैडमैट, वार्षिक रिटर्न, प्रेपरेशन अॅण्ड डॉक्युमन्टेशन फोर जीएसटी, ऑडिट क्लास बाय क्लास, अॅनालिसिस ऑफ फॉर्म नाईन सी यासह आदी महत्त्वाच्या विषयांवर यामध्ये चर्चा होणार असल्याचे दीपक अग्रवाल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला इतर पदाधिकारी उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details