अकोला - अंशकालीन महिला परिचर यांना 2 वर्षांच्या कालावधीची थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी जिल्हा परिषदे समोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दोन वर्षांचे वेतन थकले, अकोल्यात महिला परिचरांचे साखळी उपोषण - Women's Federation agitation
दोन वर्षांचे थकीत वेतन द्यावे या मागणीसाठी महिला परिचर यांनी अकोल्यात साखळी उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत वेतन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अंशकालीन महिला परिचर यांना शासनाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतची थकबाकी मार्च 2019 मध्ये अदा करण्याचे आदेश आहेत. परंतू, जिल्हा परिषद आरोग्य विभाग याबाबत कुठलीच कारवाई करत नसल्याने गेल्या ६ महिन्यांपासून या महिला परिचर यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. विशेष म्हणजे, २ डिसेंबर २०१९ रोजी महिला परिचर यांनी याबाबत आरोग्य विभागाकडे बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, त्यावेळीही त्यांना आश्वासने देण्यात आली. अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई आरोग्य विभागाकडून करण्यात आली नाही. तसेच तत्कालीन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही आश्वासने देऊन आम्हाला आमच्या हक्काच्या वेतनापासून दूर ठेवले असल्याचा आरोपही महिला परिचर यांनी केला.