अकोला- शहराच्या प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांनी आज महापालिकेवर मोर्चा काढत पालिका आयुक्तांची गाडी अडवण्याचा प्रयत्न ( Municipal Commissioner Vehicle ) केला. पिण्याचा पाण्याचा प्रश्न ( Water Issue in Akola ) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महिला आक्रमक झाल्या. त्यानंतर महिलांनी काढलेल्या मोर्चेमध्ये पालिका आयुक्तांच्या कक्षासमोर घागर आणि हांडे फेकून रोष व्यक्त केला. सुरक्षारक्षकांनी महिलांना अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Water Issue in Akola : पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून महिलांनी केला आयुक्तांची गाडी अडवण्याचा प्रयत्न - Municipal Commissioner Vehicle
शहराच्या प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांनी आज महापालिकेवर मोर्चा काढत पालिका आयुक्तांची गाडी अडवण्याचा प्रयत्न ( Municipal Commissioner Vehicle ) केला. पिण्याचा पाण्याचा प्रश्न ( Water Issue in Akola ) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महिला आक्रमक झाल्या. त्यानंतर महिलांनी काढलेल्या मोर्चेमध्ये पालिका आयुक्तांच्या कक्षासमोर घागर आणि हांडे फेकून रोष व्यक्त केला. सुरक्षारक्षकांनी महिलांना अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्रभाग क्रमांक आठमधील लहरिया नगर, नागेवाडी, वाघापूर या भागांमध्ये मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. या ठिकाणी पाईपलाईन नाही. त्यामुळे येथील महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे. दररोज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. शेवटी आज त्यांनी घागर मोर्चा काढून महापालिकेवर आपला रोष व्यक्त केला. महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांना या संदर्भात निवेदन देण्यासाठी ते आले होते. मात्र, महानगरपालिका आयुक्त येत असता त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. संतप्त महिलांनी घागर व जवळील हांडे फेकून आपला रोष व्यक्त केला. त्यासोबतच पालिका आयुक्तांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी महिलांना बाजूला केल्यानंतर आयुक्तांना जाता आले. या प्रकारानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.