अकोला - जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील ३५ वर्षीय महिलेवर गावातील ५ जणांनी लैंगिक अत्याचार केला. पाचही आरोपींना अटक केली असून हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोल्यात ३५ वर्षीय महिलेवर ५ जणांकडून लैंगिक अत्यार, आरोपींना अटक - अकोला
हिवरखेड येथून जवळच असलेल्या कार्ला बुद्रुग येथील पिडीत महिलेच्या घरावर अनोळखी व्यक्तीने दगड फेकला. हे पाहण्यासाठी ती महिला घराबाहेर आली असता तेथे उभ्या असलेल्या पाचही आरोपींनी महिलेचे तोंड दाबले. तिला शेजारील शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला
संतोष खंडेराव, विलास खंडेराव, नागोराव सपकाळ, शांताराम ससे, त्रिशरण खंडेराव अशी आरोपींची नावे आहेत. हिवरखेड परिसरातील गावात असलेल्या पीडित महिलेच्या घरावर अनोळखी व्यक्तीने दगड फेकला. हे पाहण्यासाठी ती महिला घराबाहेर आली असता, तेथे उभ्या असलेल्या पाचही आरोपींनी महिलेचे तोंड दाबले. तिला शेजारील शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणी पीडितेने हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पुढील तपास पोलीस अधिकारी वाय पी. उईके करीत आहेत.