अकोला- शेतात कामासाठी गेलेली महिला नदीच्या पुरात वाहुन गेल्याने खळबळ उडाली. ही घटना अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथे घडली. संगीता सुधाकर वाढोकार असे त्या वाहुन गेलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान पुरात वाहुन गेलेल्या महिलेचा मृतदेह पनज येथे आढळून आला आहे.
शेतात कामासाठी गेलेली महिला पुरात गेली वाहून; वडाळी देशमुख गावातील घटना - पुरात वाहून गेलेल्या महिलेचा आढळला मृतदेह
शेतात काम करणाऱ्या शेतमजूर महिला पाय घसरल्याने नदीत पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती त्यात वाहून गेली. या महिलेला वाचवण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले.
मृतदेहाचा शोध घेताना नागरिक
अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे बोर्डी नदीला पूर आला. या नदीला लागून असलेल्या शेतात काम करणाऱ्या शेतमजूर महिलेचा पाय घसरल्याने ती नदीत पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती त्यात वाहून गेली. नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच तिला वाचविण्यासाठी शोध घेण्यात आला. पण ती जवळपास सापडली नाही. शेवटी तिचा मृतदेह पनज गावाजवळ सापडला. याबाबत अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.