अकोला- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन सोहळा 'संकल्प दिन' म्हणून महानगरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यात तब्बल 1 लाख कार्यकर्ते व राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित राहून या संकल्प मेळाव्यात धोरणात्मक रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी दिली.
हेही वाचा -अकोला येथे भिंत कोसळल्यामुळे दोन सख्खे भाऊ जखमी
रिपाइं आठवले पक्षाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित साधून क्रिकेट क्लब मैदान येथे 3 ऑक्टोबर रोजी संकल्प मेळावा पार पडत आहे. यामध्ये पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी आमदार व पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या संकल्प मेळाव्यात पक्षाचे धोरणात्मक निर्णय अकोल्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती फुलकर यांनी यावेळी दिली.