अकोला -अकोट तालुक्यातील बोर्डीजवळील सुकळी या गावात गुरुवारी मध्यरात्री पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. शीतल सिद्धार्थ धुंदे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी तिचा पती सिद्धार्थ धुंदे यास अकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
लोखंडी पाइपने पत्नीचा खून; सुकळी येथील घटना - akola crime news
शीतल सिद्धार्थ धुंदे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी तिचा पती सिद्धार्थ धुंदे यास अकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
जागीच कोसळून मृत्यू
अकोट तालुक्यातील बोर्डीनजीक असलेल्या सुकळी येथील सिद्धार्थ धुंदे यांने लोखंडी पाइपने त्याची पत्नी शीतल हिला मारहाण केली. जबर मार लागल्यामुळे तीचा जागीच कोसळून मृत्यू झाला. आरोपी पती सिद्धार्थ धुंदेला पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक अकोट ग्रामीण पोलिसांनी केली आहे. नेमकी हत्या कशामुळे केली, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.