अकोला - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाच शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासारखी स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आज सकाळीही पावसाची रिमझीम सुरुच होती.
अकोल्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला - akola
अकोला - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. या शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासारखी स्थिती निर्माण केली आहे.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नव्हता. दोन दिवस आधी पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात होईल, अशी परिस्थिती नव्हती. शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जमीन ओली झाली आहे. मात्र, तरीही तरी शेतकऱ्यांना आणखी पावसाची प्रतीक्षा आहे. त्यासोबतच अकोल्याला व मुर्तीजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातही सव्वातीन दलघमी पाण्याचासाठा असल्याने हा प्रकल्प पूर्ण भरावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केल्या जात आहेत.
दरम्यान, रात्रीपासून पडत असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले. मात्र, तरी या पावसात पिके चांगली उभी राहतील याची शक्यता कमी आहे. तर हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरेल, असे शेती तज्ञांचे मत आहे.