महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP Officers Protest : आज पश्चिम विदर्भातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राहुल गांधी विरोधात आंदोलन

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी घेतलेल्या अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे खामगाव येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत (BJP Officers Protest protest against Rahul Gandhi )आहे.

BJP Office Bearers Protest
भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राहुल गांधी विरोधात आंदोलन

By

Published : Nov 18, 2022, 1:54 PM IST

अकोला :भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी घेतलेल्या अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे खामगाव येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत (BJP Officers Protest protest against Rahul Gandhi )आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती येथून भाजपचे पदाधिकारी हे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. हे आंदोलन आज दुपारी तीन वाजतापासून तर शेगाव येथील राहुल गांधी यांची सभा संपेपर्यंत सुरू राहणार आहे.

राहुल गांधी यांचा निषेध :भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अकोल्यातील वाडेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली असल्याचे पत्र पत्रकारांना दिले. मी या विषयावर जे बोललो आहे ते सत्य बोललो असल्याची भूमिका राहुल गांधी यांनी यावेळी घेतली. त्यांच्या या भूमिकेबद्दल हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप यांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत असून अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती येथील भाजपचे पदाधिकारी हे खामगाव येथे राहुल गांधी यांचा मोठ्या प्रमाणात निषेध करणार आहेत. अशी माहिती अकोला येथील भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली (West Vidarbha BJP Officers Protest) आहे.


वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन :राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे खामगाव येथे अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांची सभा ही शेगाव येथे आहे. या सभेच्या दरम्यान त्यांना भाजपला आंदोलन करण्यास पोलिसांनी मज्जाव केला असल्यामुळे भाजपतर्फे हे आंदोलन सभेच्या 30 किलोमीटर अंतरावर करण्यात येत आहे. यावेळी भाजपचे पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांचा ते निषेध करणार आहेत.


राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ :भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी हे संपूर्ण देश फिरत आहेत. शेगावमध्ये ही यात्रा आज दाखल झालेली आहे. या यात्रेदरम्यान शेगाव येथील राहुल गांधी यांची मोठी सभा आहे. राहुल गांधी यांना इंदूर येथे जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचे समजते. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. तसेच सभेच्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगण्यात येत (West Vidarbha BJP Officers) आहे.


सुरक्षा यंत्रणा सतर्क :राहुल गांधी यांना इंदौर येथून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांकडून अधिक सतर्क बाळगण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रनाही या संदर्भामध्ये सतर्क झालेले आहेत. अद्यापपर्यंत कुठलेही धमकीच पत्र किंवा माहिती आमच्यापर्यंत आली नसल्याची प्रतिक्रिया अमरावती पोलीस उपमहा निरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details