अकोला - संसदेमध्ये सरकारने सीएबी आणि एनआरसी विधेयक मांडले आहे. या विधेयकामुळे देशातील समता, एकता, बंधुता याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाने गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सिएबी आणि एनआरसी 'गो बॅक'चे नारे यावेळी सहभागी झालेल्या महिला व नागरिकांनी दिले.
केंद्र सरकारने संसदेमध्ये एनआरसी हे विधेयक ठेवले आहे. यानुसार १७२ सी २०१६ नागरिक दुरुस्ती विधेयकमध्ये बदल करून बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे या विधेयकाचा विरोध करण्यासाठी वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कासीम इलियास रसूल, जिल्हाध्यक्ष मेहमूद उस्मान, शहराध्यक्ष अझहर चौधरी, यांच्यासह शेकडो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.