अकोला - स्थानिक गुन्हे शाखेने रात्रीच्या दरम्यान दोन विविध ठिकाणी छापा टाकून 146 किलो गांजा जप्त केला आहे. संबंधित कारवाईत 23 लाख 36 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक झाली आहे. ही कारवाई हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव बुद्रुक आणि दुसरी कारवाई अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरवा गावात झाली आहे.
दोन वेगवेगळ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला 146 किलो गांजा; दोघे गजाआड
अकोल्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत स्थानिक गुन्हे शाखेने 146 किलो गांजा जप्त केला आहे.
अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत अडगांव खुर्द येथील छाप्यात राजू सोळंके आणि वारी हनुमान येथील रहिवासी कैलास पवार या दोघांकडून 40 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सहा लाख 40 हजार रुपये असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर बोरवा या गावात बंद घरातून 106 क्विंटल गांजा जप्त करण्यात आलाय. त्याची किंमत 16 लाख 96 हजार रुपये आहे.
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरवा या गावामध्ये राहणारा शत्रुघ्न चव्हाण याचे हे घर असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईदरम्यान या घरात कोणीही नव्हते. दरम्यान, या कारवाईमध्ये पोलिसांनी एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.