अकोला - वऱ्हाडी भाषेला मोठा इतिहास आहे. ही भाषा अभिजात असून तिचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भाषेला जागतिक स्तरावर नेण्याची जबाबदारी साहित्यिक, कवी यांची नव्हे तर सामान्य माणसाची आहे, असे प्रतिपादन वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केले. ते अकोल्यात दुसऱ्या वऱ्हाडी साहित्य संमेलनात आज (२ जून रविवार) बोलत होते.
दोन दिवसीय संमेलनात विविध पुस्तकांचे प्रकाशन, साहित्याकांची भाषणे ऐकण्यासाठी साहित्यिकांनी गर्दी केली होती. सकाळी मराठा मंडळ सभागृहात संमेलनाला ग्रंथदिंडी काढून सुरुवात झाली. संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, वऱ्हाडी कॅटवॉक, वऱ्हाडी रॅम्प, जोगवा यांच्यासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले.