महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परप्रांतीयांच्या घरवापसीनंतर स्थानिकांना संधी.. अकोला एमआयडीसीत 'मजूर पाहिजे'चे फलक - कंपन्यावर लॉकडाऊनचा परिणाम

मजुरांना परत आणण्यासाठी कंपनीने शासनदरबारी निवेदने दिले आहे. त्यामध्ये शासनाच्या नियमानुसार मजुरांकडून काम करून घेतले जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे या मजुरांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून एसटी महामंडळाची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून बंद पडलेल्या कंपन्यांना सुरू करता येईल, अशी मागणी कंपनी मालक करत आहेत.

akola MIDC news  lockdown effect on company  lockdown effect  अकोला एमआयडीसी  अकोला एमआयडीसी न्युज  कंपन्यावर लॉकडाऊनचा परिणाम  मजुरांची कमरतता अकोला
अकोला एमआयडीसीतील कंपन्यांच्या गेटवर 'मजूर पाहिजे'चे फलक

By

Published : Jun 2, 2020, 4:43 PM IST

अकोला - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. हजारो कंपनी बंद करण्यात आल्या. त्यामुळे मजुरांना काम नसल्याने ते आपापल्या गावाला परत गेले. स्थानिक मजुरांची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे अकोला एमआयडीसीमधील कंपनीच्या प्रवेशद्वारावरच 'मजूर पाहिजे', असे फलक लावण्यात आले आहे. ही एमआयडीसीमधील पहिलीच घटना आहे.

अकोला एमआयडीसीतील कंपन्यांच्या गेटवर 'मजूर पाहिजे'चे फलक

कारखाने, दालमिल बंद पडल्यामुळे हजारो मजूर आपापल्या गावी परत गेले आहे. परिणामी, या मजुरांअभावी सुरू करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये 20 ते 30 टक्के स्थानिक मजूर आहेत. या मजुरांच्या भरवशावर या कंपन्यांमध्ये शंभर टक्के काम होत नाही. त्यासोबतच कुशल कारागिर नसल्यामुळे कामही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या मजुरांना परत आणण्यासाठी कंपनीने शासनदरबारी निवेदने दिले आहे. त्यामध्ये शासनाच्या नियमानुसार मजुरांकडून काम करून घेतले जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे या मजुरांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून एसटी महामंडळाची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून बंद पडलेल्या कंपन्यांना सुरू करता येईल, अशी मागणी कंपनी मालक करत आहेत.

प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे कंपनी मालकांचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी कंपनी मालक प्रशासनाकडे विनंती करीत आहे. परंतु, प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी कंपनीच्या प्रवेश द्वारावर कुलूप लावले असून 'मजूर पाहिजे', असे फलकही लावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details