अकोला -हिवरखेड ते अकोट दरम्यान द्वारकेश्वर नजीक वान प्रकल्पाची ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आज अचानक फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.
अकोल्यात वान प्रकल्पाची पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाण्याची नासाडी - Water Supply Scheme
अकोल्यातील द्वारकेश्वरजवळील गावातील पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

वान प्रकल्पाची पाईपलाईन फुटली
वान प्रकल्पाची फुटलेली पाईपलाईन
द्वारकेश्वरजवळील गावातील पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. तसेच हे पाणी शेतात आणि गावात पसरल्यामुळे चिखल झाला आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या गावातील पाणीपुरवठा बंद केला आहे. ही पाईपलाईन दुरुस्त झाल्याशिवाय पुढील गावांना पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.