महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाण धरणाचे पाणी अकोल्यासाठी आरक्षित; अकोट, तेल्हारात कडकडीत बंद - शहर वाढीव पाणीपुरवठा योजना

अकोला, बुलढाणा, अमरावती सीमेवर वसलेल्या तेल्हारा तालुक्यातील वाण धरणातील पाणी अकोल्यासाठी शासनाने आरक्षित केल्यामुळे तालुक्यात सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे

अकोट, तेल्हारात कडकडीत बंद

By

Published : Sep 10, 2019, 4:27 PM IST

Updated : Sep 10, 2019, 5:28 PM IST

अकोला - अकोट मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या वाण धरणाचे पाणी अकोला शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी अकोट, तेल्हारासह ग्रामीण भागात नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.

अकोट, तेल्हारात कडकडीत बंद

हेही वाचा - बाळापूर विधानसभा मतदारसंघ : भारिपचे सिरस्कार मारणार काय विजयाची हॅट्ट्रिक? विरोधकांनीही कसली कंबर

अकोला, बुलढाणा, अमरावती सीमेवर वसलेल्या तेल्हारा तालुक्यातील वाण धरणातील पाणी अकोल्यासाठी शासनाने आरक्षित केल्यामुळे तालुक्यात सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर सर्वपक्षीय मतदारसंघ बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा - पती-पत्नीचा समेट घडवण्यासाठी आलेल्या कुटुंबांमध्ये झाली हाणामारी

बंदमध्ये अकोट शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. या बंदमधून आरोग्य सेवा वगळण्यात आली होती. त्यामुळे वाहतुक सुरू होती. हा बंद शांततेत पार पडला. बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधव व विविध राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Last Updated : Sep 10, 2019, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details