अकोला - जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले आहे. ज्याठिकाणी ग्रामीण भागातून मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या बातम्या होत्या, त्या ठिकाणी दुपारपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.57 टक्के मतदान झाले होते. सहा वाजेपर्यंतचे 60 टक्के मतदान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सर्वात जास्त मतदान हे अकोट आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघात झाले असून या ठिकाणी 59 टक्के मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान हे अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम येथे 50 टक्क्यांच्या जवळपास झाले आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना घडली नाही.
अकोल्यात पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत - Maharashtra assembly polls live updates
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पातुर तालुक्यातील पाचरण या गावात एकही उमेदवार प्रचारादरम्यान फिरकला नसल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार केला होता. परंतु, त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख हे त्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर ग्रामस्थांनी मतदान केले.
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पातुर तालुक्यातील पाचरण या गावात एकही उमेदवार प्रचारादरम्यान फिरकला नसल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार केला होता. परंतु, त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख हे त्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर ग्रामस्थांनी मतदान केले. तर अकोट विधानसभा मतदारसंघातील लामकानी आणि तेल्हारा तालुक्यातील तेलई या गावात बहिष्कार टाकल्याची माहिती आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात बहिष्कार टाकला नसल्याचे सांगितले.
हेही वाचा -राजकीय संदेश असलेल्या बॉक्सचा हुबळीमध्ये स्फोट, महाराष्ट्रातील आमदाराचे नाव असल्याने खळबळ
दरम्यान, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात नेमका कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली आहे, हे 24 ऑक्टोबरला समजणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.