महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात मतदारच बनले भाजप आमदाराचे विरोधक; आमदारकी राखणार का? - बाळापूर विधानसभा मतदारसंघ

विधानसभा निवडणुकीचा बिगुल येत्या दोन तीन दिवसांत वाजण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभुमीवर अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचा घेतलेला आढावा...

अकोटा मतदारसंघ

By

Published : Sep 21, 2019, 11:56 AM IST

अकोला- अकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात विरोधी पक्ष नव्हे तर मतदारच विरोधक बनले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांनी याचा फायदा घेतल्यास त्यांना हरवणे सहज सोपे होईल. या मतदारसंघात त्यांच्याविरोधात मतदारांचीच विरोधाची लाट असताना अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर हे मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने अकोट मतदारसंघाचा घेतलेला आढावा

अकोट विधानसभा मतदारसंघात 2014मध्ये 2 लाख 84 हजार 843 मतदार होते. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या धरून हा आकडा तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तेल्हारा आणि अकोट हे दोन तालुके मिळून अकोट विधानसभा मतदारसंघ हा मुस्लीम आणि पाटील बहुल आहे. त्याखालोखाल हिंदी भाषिकांची संख्या जास्त आहे. या मतदार संघात बारी आणि माळी समाज येथील चित्र बदलू शकते अशी चर्चा आहे. 2014च्या निवडणुकीत याठिकाणी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर तर भारिप तिसऱ्या क्रमांकावर होती. शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होते. तरीही या सर्व पक्षांकडून विजयाचा दावा होत असला तरी या विरोधकांपैकी यावेळी भाजपच्या विद्यमान आमदारांना शह दिला जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या संघात भाजपने पहिल्यांदा झेंडा रोवला आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पाच वर्ष या मतदारसंघात काम केले आहे. परंतु, शेवटच्या काळात त्यांच्याविरोधात मतदारांमध्ये अचानक नाराजी निर्माण झाली. तेल्हारा येथे आलेले भारतीय बटालियन हे अकोला तालुक्यात स्थलांतरित झाले. त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यापाठोपाठ वान धरणाचे पाणी अकोला येथे नेण्यात येणार असल्याच्या निर्णयामुळे येथील शेतकरीही दुखावले. यासोबतच स्थानिक आमदारांची मागणी विकास न करणाऱ्या विद्यमान आमदाराविरोधात पक्षातूनच बंडखोरी सुरू झाली. परिणामी, मतदारच नव्हे तर पक्षातूनही स्थानिक आमदारांची मागणी जोर धरत भाजपच्या कार्यालयात पोहोचली.

हेही वाचा-बाळापूर विधानसभा मतदारसंघ : भारिपचे सिरस्कार मारणार काय विजयाची हॅट्ट्रिक? विरोधकांनीही कसली कंबर
काँग्रेसच्या गटातून संजय बोडखे, महेश गणगणे, बद्रू जमा तर शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे, अनिल गावंडे, चार वेळा नगरसेवक असलेले दिलीप बोचे यांची नावे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बोचे आणि भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे हे आमदारकीच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. दरम्यान, विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात असलेल्या लाटेचा फायदा घेत पक्षातूनच काही पदाधिकारीही आमदारकीच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारे जोर लावत आहेत. परंतु, भाजपमधून आमदार भारसाकळे यांनाच उमेदवारीची शक्यता आहे.

अकोट विधानसभा मतदारसंघ हा आधीपासून शिवसेनेचा मतदारसंघ आहे. भाजप-सेना युती झाल्यास या मतदारसंघातून भाजप उमेदवार उभा करेल की शिवसेना यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नेमका कोणत्या पक्षाला युतीतून हा मतदारसंघ सुटेल याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीतही राष्ट्रवादी काँग्रेसला दोन विधानसभा मतदारसंघ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी बाळापूर आणि अकोट या ठिकाणी या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही मागणी केली आहे. अद्यापही निर्णय स्पष्ट न झाल्यामुळे युती आणि आघाडीला कोणते मतदार मिळतात याबाबत संभ्रमावस्था आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details