अकोला - बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात महाकाय अजगर पकडण्यात आले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व वन्यजीव रेस्क्यू पथक यांच्या पथकाने या अजगराला जीवदान दिले. ही घटना रविवारी घडली. वनविभागाच्या सूचनेनुसार या अजगराला सुरक्षित स्थळी त्याला नैसर्गिक परिसरात सोडण्यात आले.
बाळापुर तालुक्यातील बहादुरा गावातील दत्ता मेसरे गिरीष घाटे, शिवा माळी, पवण माळी, विवेक माळी यांना घर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आणि ओलसर व थँडावा असलेल्या स्थळी अजगर दिसले. या अजगराला पाहून ग्रामस्थ घाबरले. त्यांनी याबाबत मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे आणि वन्यजीव विभागाला माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होवून अजगराला बघितले. बाळ काळणे, वनरक्षक गुडे, चालक यशपाल इंगोले व पवन भगत यांनी हा अजगर पकडला. नंतर ते अजगर जंगलात सोडून देण्यात आले.
अजगराची वैशिष्ट्य