अकोला : जिल्ह्यातील मासा देगाव या गावासाठी संजीवनी ठरलेल्या विहिरीला बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव आणण्यात येत आहे. याला विरोध केल्याने मासा देगाव ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे गुन्हे मागे घेण्यात यावे व ही विहीर बुजविण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करून पालकमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले.
अकोला : गावातील विहीर बुजविण्यात येऊ नये; मनसे तालुकाध्यक्षांचे पालकमंत्री कडू यांना निवेदन - पालकमंत्री बच्चू कडू अकोला बातमी
राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मासा देगाव येथे खोदण्यात आलेली विहीर अतिक्रमणाचे कारण देऊन लालफितशाहित अडकवून बुजवण्याचे तुच्छ राजकारण सुरू आहे. पाच वर्षापासून तहानलेल्या जनतेसाठी जीवन संजीवनी असलेली विहीर बुजविण्यापासून वाचावी व समस्त ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळवून देऊन न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मासा देगाव येथे खोदण्यात आलेली विहीर अतिक्रमणाचे कारण देऊन लालफितशाहित अडकवून बुजवण्याचे तुच्छ राजकारण सुरू आहे. या विहिरीपेक्षाही चार मीटर कमी अंतरावर असलेली विहीर पंचवीस वर्षापासून सर्रास वापरात आहे. गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय सुरू असताना विहीर बुजवण्याचे राजकारण सुरू आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडे याविषयी वारंवार दाद मागितली असता कुठलेही सहकार्य त्यांच्याकडून मिळालेले नाही. अधिकाऱ्यांनी तुघलकी कारभार चालवीत ग्रामपंचायत तसेच सरपंच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तसेच विहीर बुजविण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता वाकोडे हे प्रचंड राजकीय दबाव आणत आहेत. विहीर बुजवून व शासनाचे 55 लाख रुपये खड्ड्यात घालून वाकोडे नेमके काय साध्य करू इच्छितात हे कळायला मार्ग नाही.
पाच वर्षापासून तहानलेल्या जनतेसाठी जीवन संजीवनी असलेली विहीर बुजविण्यापासून वाचावी व समस्त ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळवून देऊन न्याय द्यावा. अन्यथा शेवटचा पर्याय म्हणून जगण्यापेक्षा जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनात दिला आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सतीश फाले यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. तसेच या निवेदनावर पंकज साबळे, प्रशांत फाले, रोशन फाले, पुंजाजी स्वर्गीव, लालाजी दवंडे, महादेव स्वर्गीव, सौरभ फाले, चंदू अग्रवाल, ललित यावलीकर यांच्यासह आदी उपस्थित होते.