महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी शहराध्यक्षांच्या नियुक्तीने पदाधिकाऱ्यांमध्ये भरला उत्साह - News about Vijay Deshmukh

राष्ट्रवादी काँग्रेस पभातर्फे अकोला शहर अध्यक्ष पदासह विविध पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या. या सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे सत्कार गांधी चौक येथे करण्यात आले.

Vijay Deshmukh has been appointed as the city president of Akola NCP
राष्ट्रवादी शहराध्यक्षांच्या नियुक्तीने पदाधिकाऱ्यांमध्ये भरला उत्साह

By

Published : Jan 3, 2021, 2:08 AM IST

अकोला - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अकोला शहराध्यक्षपदी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ दूर झाल्याने उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे आज गांधी चौक येथे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी शहराध्यक्षांच्या नियुक्तीने पदाधिकाऱ्यांमध्ये भरला उत्साह

माजी शहराध्यक्ष राजकुमार मूलचंदानी हे असताना शहरात कुठलेही कार्यक्रम झाले नाही. किंवा पक्षाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे या पक्षापासून कार्यकर्ते दूर गेले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष यांनी शहराध्यक्षपदी माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांची नियुक्ती केली आहे. यासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथिल कार्यकारी परिषद सदस्य पदी आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य संगठन सचिवपदी कृष्णा अंधारे यांची नियुक्ति केली. या सर्वांचा सत्कार कार्यक्रम पदाधिकारी, कार्यकर्ता, नगरसेवक यांनी गांधी चौक येथे केला. शाल श्रीफल व पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी उपमहापौर मोहम्मद रफीक सिद्दीकी, माजी गटनेता मनोज गायकवाड, माजी नगरसेवक अजय रामटेके, नगर सेविका ऊषाताई विरक, नगरसेवक फैयाज खान, नगरसेवक नितीन झापर्डे, नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, याकुब पहेलवान, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, देवानंद ताले, बुढन गाडेकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details